Bhosari News : कठड्यावर गांजा ओढत बसलेल्या इसमाला अटक 

एमपीसी न्यूज – बिल्डिंगच्या कठड्यावर गांजा ओढत बसलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आयनॉक्स कंपनी समोरील मोकळ्या जागेत, पडक्या बिल्डिंगच्या कठड्यावर, एम आय डी सी भोसरी येथे मंगळवारी (दि.12) सकाळी 11.30 वा. ही कारवाई करण्यात आली. 

 

राजू पुरुषोत्तम गायकवाड (वय 34, रा. खंडे वस्ती, एम आय डी सी भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.  पोलीस हवालदार संतोष देवराम दिघे (वय 36) यांनी याबाबत एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आयनॉक्स कंपनी समोरील मोकळ्या जागेत, पडक्या बिल्डिंगच्या कठड्यावर, एम आय डी सी भोसरी येथे चिलीम द्वारे गांजा ओढताना आढळून आला. त्याच्याजवळ 03 ग्रॅम गांजा सापडला. आरोपी अटक असून, एम आय डी सी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.