Maval News : आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रूपेश घोजगे

एमपीसी न्यूज – आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मंगरूळ गावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते रूपेश विठ्ठल घोजगे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, मावळ तालुका खादी ग्रामउद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी  काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले आदी उपस्थित होते.

घोजगे यांनी याआधीही श्री पिरसाईबाबा विविध विकास सहकारी सेवा संस्थेची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. मागील महिन्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही घोजगे यांची पुन्हा बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे.

आपली राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली आंदर मावळ  राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

घोजगे यांच्या निवडीबद्दल आंदर मावळ परिसरात त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.