Jejuri : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी ‘असा’ असेल वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri) येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ आणि जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने तसेच अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 7 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Jejuri : जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती

तर वाहतुकीस लावलेले निर्बंध 7 ऑगस्ट रोजी होणार्‍या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत.

पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक (Jejuri)

बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण वाहतूक

पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण – सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.