Jejuri : जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती

एमपीसी न्यूज : राज्य शासनाच्या (Jejuri) विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी सोमवार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाला भेट दिली. कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक स्तरावर करून घेण्यात आली आहे.

विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दालने कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे देखील दालन असणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याची सुविधाही येथे असणार आहे. याच ठिकाणी रोजगार मेळाव्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

Chinchwad : चिंचवड येथून तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक

पुणे जिल्ह्यातील उत्पादनाची माहिती देणारे ‘मेक इन पुणे’ प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे (Jejuri) आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येतील. त्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेने गावपातळीवरील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.