Jitendra Wagh :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा आजही प्रेरणादायी व आदर्शवत

एमपीसी न्यूज – सध्याच्या जगात माहितीचा महापूर आला असताना मानवतेची मूल्ये जपणूक करण्यासाठी परिवर्तनात्मक संघर्ष करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे महापुरूष आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असतात.  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांची ग्रंथ संपदा आजही प्रेरणादायी व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ (Jitendra Wagh) यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, संदीप खोत, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, प्रफुल्ल पुराणिक, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नितिन घोलप, शिवाजी साळवे, अरुण जोगदंड, संदीप जाधव, यादव खिलारे, दशरथ सकट, दत्तू चव्हाण, डॉ. धनंजय भिसे, मनोज तोरडमल, डी.पी. खंडाळे, अविनाश कांबीकर, युवराज दाखले, संतोष जोगदंड, सतीश भवाळ, नाना कसबे, विशाल कसबे, सविता आव्हाड, अरुणा लोंढे, कविता आव्हाड, मीना खिलारे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DFL India : आपल्या सैन्याला जाणून घेण्यासाठी खास ‘आझाद हिंद’ प्रदर्शनाचे आयोजन

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ (Jitendra Wagh) म्हणाले, आजची परिस्थिती पाहता महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांची ग्रंथ संपदा आजही प्रेरणादायी व आदर्शवत आहे. या महापुरुषांच्या ग्रंथांचे वाचन प्रत्येकाने करणे आवश्यक असून त्यांचे व्यापक विचार सर्वांनी जोपासावे असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.