Talegaon Dabhade : श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती महोत्सवास सुरुवात

एमपीसी न्यूज  – तळेगाव शहर परिसरातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये सोमवार (दि. १०) पासून पारंपारिक पद्धतीने  वारकरी संप्रदायाच्या ‘काकड आरती महोत्सवास’ भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे  पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष  शिवाजी भेगडे यांच्या परिवारातील  सौ.अरुणा भेगडे, सिद्धार्थ भेगडे,शुभम भेगडे,सौरभ भेगडे यांचे हस्ते पुजा व आरती करण्यात आली आहे.

पहाटेची पुजा व भजन तसेच  काकड आरती करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,यतिनभाई शहा,पुरोहित अतुलकाका देशपांडे, किरण गवारे,  गोपाळे गुरूजी यांनी केले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.