Kasarwadi : श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे

एमपीसी न्यूज- कासारवाडी येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त धार्मिक, मनोरंजनात्मक तसेच कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवार दि.1 ते 3 मे दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी (दि 1) सकाळी 6 वा. अभिषेक व होमहवन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी भैरवनाथ महाराजांची पालखीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी मराठी सांस्कृतिक लावण्यांचा कार्यक्रम “बारा गावच्या बारा अप्सरा” सादर करण्यात आला.

तिसऱ्या दिवशी शुक्रवारी कै.तानाजी पांडुरंग लांडगे क्रीडा संकुल येथे कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. यामध्ये 110 मल्लानी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अमर साबळे, नगरसेवक शाम लांडे, रुस्तुम-ए-हिंद पै.अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी पै. विकी बनकर, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे, वाहतूक निरीक्षक ओंबाळे उपस्थित होते. 3 दिवस चाललेल्या उत्सवामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी मदत व विशेष सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी यांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष पै. काळूराम लांडगे, माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, पै. रतनशेठ लांडगे, पै.जितेंद्र लांडगे, पै.धोंडीबा लांडगे, प्रकाश जवळकर, दशरथ लांडगे, बाळासाहेब जवळकर, मेहबूब इनामदार, शशिकांत घुमटकर, अशोक लांडगे, संतोष लांडगे यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.