Dehuroad : पैशांसाठी हॉटेल मालकावर हल्ला करणा-या दोघांना अटक

मपीसी न्यूज – पैसे घेऊन देहूरोड येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी केली.

अक्षय लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. वाघेश्वरनगर झोपडपट्टी, गोरेवस्ती, वाघोली), देविदास उर्फ अमोल नागनाथ लष्करे (वय 23, रा. सिद्धार्थनगर, वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल गलफडे, विजय शिंदे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना माहिती मिळाली की, देहूरोड येथे राजवाडा हॉटेलच्या मालकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी मुकाई चौक येथे थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा रचून अक्षय आणि देविदास यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत अन्य दोन आरोपी असल्याचेही आरोपींनी सांगितले.

हा गुन्हा आरोपींनी अजित साळवी आणि सचिन साठे यांच्या सांगण्यावरून केला आहे. याबदल्यात त्यांनी आरोपींना चार लाख रुपये दिले आहेत. यावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपासासाठी देहूरोड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, मयूर वाडकर, प्रवीण दळे, किरण आरुटे, तुषार शेटे, हजरत पठाण, संजय गवारे, संदीप ठाकरे, जमीर तांबोळी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.