Kasarwadi : रेल्वेच्या धडकेत बसचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत बसचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेदोनच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ झाला.

एस. यु. कांबळे असे मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास धावत्या रेल्वेची धडक बसल्याने एकाच मृत्यू झाला. त्याच्याजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे पगारपत्र आहे. त्यावर तो अहमदनगर आगारात बसचालक म्हणून नोकरीस असल्याचे म्हटले आहे.

कांबळे यांच्या अंगावर पोपटी रंगाचा हाफ टीशर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, चेहरा गोल, उंची पाच फूट चार इंच, अंगाने मजबूत, रंग काळासावळा आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. याबाबत वल्लभनगर आगारात जाऊन रेल्वे पोलीस चौकशी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.