Pimpri News : नारायण लोखंडे यांच्यामुळे कामगारांच्या जीवनात नवी पहाट – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – देशभरातील कामगार चळवळीचे प्रेरणास्थान नारायण लोखंडे यांनी कामगारांचे दुःख दारिद्र्य व शोषण पाहून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेतले. (Pimpri News) आठवड्याची सुट्टी तसेच कामाचे तास कमी करण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान फार मोठे असून त्यांच्यामुळे कामगारांच्या जीवनात नवी पहाट आली, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

कष्टकरी संघर्ष  महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समितीतर्फे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते  काशिनाथ नखाते, चंद्रकांत कुंभार, ओमप्रकाश मोरया,नाना कसबे, अंजली मोरे,बदाम  कांबळे,मालन नागटिळक,बबीता साळवे ,सीताबाई धोत्रे,उषा तुपे,अर्जुन इंगवले,नारायण कदम आदी उपस्थित होते.

Chinchwad Bye Election : राहुल कलाटे निवडणूक लढविण्यावर ठाम; आज एकानेही घेतली नाही माघार

नखाते म्हणाले  “नारायण मेघाजी लोखंडे यांनी  1881 मध्ये इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करण्यास भाग पाडले. चार भरपगारी सुट्ट्या या प्रत्येक महिन्यास तेव्हापासून सुरू झाल्या. 1884 मध्ये पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (Pimpri News) रावबहादूर यांनी घालून दिलेला कामगार चळवळीचा आदर्श हा आजही प्रेरक असून त्यांच्यामुळेच कामगार चळवळी आज ही ठाम राहून कार्यरत आहेत. अन्यथा आजही कामगार गुलामगिरीतून मुक्त झाला नसता. आताच्या केंद्र सरकारने जे नवीन कामगार कायदे आणले आहेत. हे कामगारांच्या हिताला धोकादायक असून हे रद्द झाले पाहिजे त्यासाठी देशव्यापी लढा उभारण्याची गरज  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.