Chinchwad News : व्यवसायाच्या आमिषाने साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमातून व्यवसायाचे (Chinchwad News) आमिष दाखवून एकाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 2 नोव्हेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान चिंचवड येथे घडला.

ग्रीन नेचरवेल कंपनी (विजयनगर, इंदोर, मध्यप्रदेश) व ग्राहक प्रविण चंदानी (रा. महाराणा प्रतापरोड, जुने पनवेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल प्रमोद भारंबे (वय 27, रा. स्पेक्टरम हॉस्टेल, गुरुद्वारा चौक, आकुर्डी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : नारायण लोखंडे यांच्यामुळे कामगारांच्या जीवनात नवी पहाट – काशिनाथ नखाते

आरोपींनी फिर्यादी कपिल यांना ऑनलाईन माध्यमातून व्यवसायाचे आमिष दाखवले. कपिल यांना मेडीकल सॅम्पल पाठवून ऑनलाईन ग्राहकाचे नाव देवून विश्वास संपादन केला. (Chinchwad News) मेडीसीनकरिता ऑर्डर देवून 6 लाख 57 हजार रुपये त्यांच्याकडून ऑनलाईन घेतले. त्यानंतर ऑर्डर व मेडीसीन न देता कपिल यांची डिलरशिप रद्द केली व मोबाईल क्रमांक बंद करून संपर्क तोडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.