Khed : भात कापणीचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – भात कापणीच्या गुत्त्याचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून (Khed)एकाने पती-पत्नीला मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी वाकी खेड येथे घडला आहे.

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Khed) समीर बबन कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. यावरून गुलाब रामभाऊ पांगळे वय 50 रा. वाकी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : काळेवाडी – चिंचवड जोडणा-या मदर टेरेसा उड्डाणपूलावरील पथदिवे बंद अवस्थेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या शेतातील बातच कापणीचे काम आरोपीला 2 हजार रुपयांना गुत्त्यात दिले होते. त्यानुसार फिर्यादीने आरोपीला 1 हजार 300 रुपये आगाऊ दिले. तरीही उर्वरीत 700 रुपये मागण्यासाठी आरोपी फिर्यादीच्या घरी आला व त्याने तेथे 700 रुपयांसाठी हुज्जत घालत फिर्यादीला विटेने मारहाण केली.यय तसेच बांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला ही मारहाण केली.

 

यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.