Pimpri : वसंतदादा पाटील यांनी सहकार क्षेत्राला निर्णायक वळण दिले – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे (Pimpri) थोर स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते होते. त्यांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवून महाराष्ट्रासाठी अनेक लोकहितकारक निर्णय घेतले, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त जुनी सांगवी येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी सतिश पाटील, आरोग्य निरिक्षक धनश्री जगदाळे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र अहिरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भोसले, सुहास वेदपाठक उपस्थित होते.

महाष्ट्रातील सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते तसेच क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, विधायक कार्य करणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविली.

Alandi : कंत्राटी कामगारांना समान वेतन व दिवाळी बोनस मिळावा; मजदूर काँग्रेसची मागणी

वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा असे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, (Pimpri) नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला, असेही अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले.

https://youtu.be/o1fuPOPh0DI?si=j9XNwSX-KPq8PZxZ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.