Vadgaon Maval News : हभप दिलीप महाराज खेंगरे यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पुणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज : भाजे मावळ येथील कीर्तनकार हभप दिलीप महाराज खेंगरे यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पुणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

ही निवड महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप कृष्णाजी महाराज रांजणे यांनी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहातील नियुक्ती प्रदान सोहळा कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत केली. तसे त्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे होत्या. या वेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी महापौर संजोग वाघेरे, चंद्रकांत महाराज वांजळे, संतोष महाराज पायगुडे, हभप रामेश्वर महाराज शास्त्री, सतिश महाराज काळजेसह अनेक वारकरी, कीर्तनकार उपस्थित होते.

वारकरी संप्रदायात काम करत असताना अध्यात्मिक, संस्कृतीचे तत्त्वज्ञान, प्रचार- प्रसार समाज प्रबोधनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सामाजिक हितासाठी गावोगावी युवकांचे संघटन करून समाजामध्ये सुख, शांती,समाधान व आनंद प्राप्त व्हावा या करिता विशेष काम करणार असल्याचे खेंगरे यांनी यावेळी सांगितले.

खेंगरे यांच्या निवडीने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हभप जीवनमामा खानेकर यांनी केले तर आभार जालिंदर महाराज काळोखे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.