Pune Crime : हवेली तालुका परिसरात दहशत मजविणाऱ्या कोयता गँगचे पाच जण जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांनी हवेली तालुका (Pune Crime) परिसरात दहशत मजविणाऱ्या कोयत्या गँगच्या पाच जणांना जेरबंद केले आहे. या गॅंगमधील सहा आरोपी आद्याप फरार आहेत.

याबाबत कविता तनपुरे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. सुरज ठाकुर, वय 21 वर्षे, निलेश सहा, वय 23 वर्षे, अक्षय चव्हाण, वय 23 वर्षे, सागर पाटील, वय 22 वर्षे, निकुन ऊर्जा अनिकेत भोर, वय 22 वर्षे, सर्व रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक केले आहे.

सहा आरोपी फरार असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

काल रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4.55 वा च्या सुमारास मौजे गोऱ्हे बुद्रुक, तालुका हवेली, जि. पुणे येथे अनिल अडके यांनी यश जगताप याच्यासोबत मोटरसायकल हळू चालविण्यास सांगितल्याच्या कारणावरून भांडण केले. तसेच यश जगताप याने त्याचे साथीदार नचिकेत जगताप, सुरज ठाकूर, पंकज चव्हाण, अक्षय चव्हाण उर्फ चपाती मोन्या, अनुप शेलार, निलेश सहा, सागर पाटील, (Pune Crime) अक्षय पारगे, अनिकेत मोरे आणि करण शिंदे सर्व राहणार गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे यांनी गर्दी जमवून नचिकेत जगताप याने त्याच्याकडील मोठ्या लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ- दमदाटी करून समाजात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले.

Sangavi News : मकरसंक्रांती निमित्त संघाच्या वतीने विविध प्रात्यक्षिके सादर

तसेच फिर्यादी कविता तनपुरे व त्यांचे पतींना शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीचा भाऊ अक्षय नानगुडे याला मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली होती. त्याबाबत हवेली पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम  323, 143, 147, 148 149 504 506, शस्त्र अधिनियम 4, 25 क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व जनतेमध्ये दहशत पसरविणारा असल्याने या गुन्ह्याची पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग, भाऊसाहेब ढोले पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणून तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस निरीक्षक नितीन नाम व इतर यांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते.

या पथकाने गोपनी बातमीदारामार्फत बातमी काढून या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींपैकी आरोपी सुरज ठाकुर, वय 21 वर्षे, निलेश सहा, वय 23 वर्षे, अक्षय चव्हाण, वय 23 वर्षे, सागर पाटील, वय 22 वर्षे, निकुन ऊर्जा अनिकेत भोर, वय 22 वर्षे, सर्व रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक केले आहे. अटक केलेल्या टोळीतील सदस्यांवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. (Pune Crime) यापुढे सुद्धा अशाप्रकारे दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.