Lata Mangeshkar Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानात दाखल, पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

 

लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी रवाना, प्रभूकुंज ते शिवाजी पार्क असा लतादीदींच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, संध्याकाळी ६.३० वाजता  अंत्यसंस्कार होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही शिवाजीपार्कवर दाखल झाले आहे.पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.