Shiku Anande : देहविक्री करणा-या महिलांसाठी ‘शिकू आनंदे’ प्रकल्पाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : काहींना जबरदस्तीने तर काहींना नाईलाजास्तव या व्यवसायात उतरावे लागले.  त्यामुळे अनेक स्त्रियांची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकण्याचे (Shiku Anande) स्वप्न पूर्ण झाले नाही. परंतु, आज  हातात पेनही न धरता येणाऱ्या महिलांनी मुळाक्षरे लिहून अक्षरांशी गट्टी केली. तर अर्धवट शिक्षण झालेल्या काही महिलांनी दहावी पूर्ण करण्याची जिद्द धरली.

बुधवार पेठेतील देहविक्री करणा-या महिलांसाठी मैत्र युवा फाऊंडेशन व सहेली संस्थेतर्फे ‘शिकू  आनंदे’ अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ बुधवार पेठेतील मांगल्य मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, मधुमिलिंद मेहेंदळे, अभिनेता तेजस बर्वे, मैत्र युवा फाऊंडेशनचे संकेत देशपांडे, सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, डाॅ. सचिन वानखेडे उपस्थित होते.

Agneepath Scheme: आंदोलनकर्त्यांना भारतीय सेनेचे सडेतोड उत्तर; जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना मोठा फटका

मिलिंद जोशी म्हणाले, ज्यांना समाजात बदल घडवायचा आहे त्यांनी अशा उपक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे. ‘शिकू आनंदे’ या उपक्रमा अंतर्गत महिलांनी भरपूर शिका. शिकल्यामुळे आपल्याला जग समजते. शिक्षणामुळे आपल्या जीवनात बदल घडतो, प्रकाश येतो, आपली प्रगती होते. शिक्षणामुळे विचारांची परिभाषा वृंदावते. त्यामुळे इतरांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी शिका, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेत काम करणाऱ्या तरुणाईचे त्यांनी कौतुक केले.

संकेत देशपांडे म्हणाले, देहविक्री करणाऱ्या (Shiku Anande) महिलांच्या बोलण्यातून त्यांचे शिक्षण न झाल्याची खंत नेहमी जाणवायची. याच जाणिवेतून त्यांच्या शिक्षणासाठी शिकू आनंदे हा प्रकल्प आम्ही सुरु केला. सुरुवातीला दोन महिने आम्ही हा प्रकल्प राबवून पाहिला त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने रविवार पासून हा वर्ग कायमस्वरूपी सुरू करणार आहोत. यामध्ये या महिलांना शिक्षणासोबत लेखन, वाचन व इतर कौशल्ये शिकविण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.