Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी वीस हजारांहून कमी रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात रविवारी हजारांहून कमी नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 57 लाख 31 हजार 815 इतका झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 53 लाख 62 हजार 370 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, रविवारी 22 हजार 532 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 2 लाख 71 हजार 801 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी राज्यात 402 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 94 हजार 844 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.65 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 93.55 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 48 लाख 61 हजार 608 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 19 लाख 98 हजार 976 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 12 हजार 981 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.