Pimpri New: पवना धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा; 1 जून पासून धरण परिसरात 243 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात   पाऊस सुरू झाला आहे.  1 जून पासून धरण परिसरात 243 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील साठ्यात 0.33 टक्के वाढ झाली आहे.

गतवर्षीपेक्षा धरणात पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 31.84 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजच्या तारखेला धरणात 29.60 टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरण शंभर टक्के भरले होते.

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 74मि.मि.

# 1 जूनपासून झालेला पाऊस = *243मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस      183

# धरणातील सध्याचा पाणीसाठा 29.60% टक्के

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा        31.84% टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
0.33% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 00% टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.