Agriculture Mobile App : दौंडकरवाडीच्या शेतकऱ्यांना कृषिदूतांनी दिले शेतीविषयक मोबाईल ॲपच्या वापराबाबतचे धडे

एमपीसी न्यूज – पद्मभूषण वसंत दादा पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, आंबी तळेगाव दाभाडे या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (कृषिदूत) दौंडकरवाडीमधील शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध मोबाईल ॲपच्या (Agriculture Mobile App) वापराबाबत माहिती दिली. त्या मोबाईल ॲपच्या वापराचा शेतकऱ्यांना होणारा फायदा कृषिदूतांनी शेतकऱ्यांना पटवून दिला.

 

 

सौरभ ढोरे, मंथन तांबे, प्रज्वल थोरात, चैतन्य होळकर, आकाश चौरे, विनोद कुमार राऊला या कृषिदूतांनी माहिती दिली. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

PCMC News : महापालिका वैद्यकीय विभागाच्या 128 जागांसाठी 19  हजार उमेदवारांचे अर्ज

 

गावातील चौकात जमलेल्या शेतकऱ्यांना एकत्र जमवून कृषिदूतांनी शेती आधारित प्रात्यक्षिके, शेत जमीन व्यवस्थापन, पिकांचे उत्पादन याबाबतची माहिती मार्केट यार्ड, भारत ॲग्री या मोबाईल ॲपवर (Agriculture Mobile App) कशी पहावी. याचा शेती व्यवस्थापन आणि उत्पन्न वाढीवर होणारा परिणाम कृषिदूतांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.