Yog Shibir : योग शिबिराला मोठा प्रतिसाद; लहान मुलांचा सहभाग

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून आणि सोमेश्वर फाउंडेशन व इंदिरा गांधी मॉडेल स्कूल औंध यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिन’ निमित्त 21 जून रोजी  इंदिरा गांधीमॉडेल स्कूल औंध येथे ‘विशेष योग शिबिर’ (Yog Shibir) संपन्न झाले. या शिबिरात लहान मुलांनी खुप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

International Yoga Day : योगासनांचे प्रात्यक्षिक आणि महत्व जाणून घेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योगदिन साजरा

 

या शिबिराची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की,  औंध, बालेवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातील लहान मुलांनी या शिबिरात (Yog Shibir) मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा भर नेहमीच योगमय सुदृढ निरोगी राष्ट्रनिर्माण करण्यावर आहे. यामुळे मुलांवर लहान वयातच योगसंस्कार घडावे यादृष्टीने हे योग शिबिर (Yog Shibir) आयोजित केले होते. मुलांचा उत्साह व उत्स्फूर्त सहभाग बघून योगाबद्दल त्यांच्या मनात जागृती घडविण्यात हे शिबिर यशस्वी झाले, असे मी म्हणू शकतो.

या शिबिरात योगप्रशिक्षक शिवाली महेंद्र बामगुडे यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. निरोगी जीवनाची गुरकिल्ली असलेल्या योगसाधनेचा दैनंदिन जीवनात उपयोग आणि महत्व त्यांनी विशद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.