Liquor Seized: पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सव्वा पाच लाखांचे मद्य जप्त, तीन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : एमआयडीसी भोसरी, तळेगाव एमआयडीसी व रावेत पोलिसांनी वेगवेगऴ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सव्वा पाच लाखांचे मद्य जप्त कऱण्यात आले असून तीन आरोपींना अटक केली आहे. (Liquor Seized) ही कारवाई मंगळवारी (दि.26) मोशी, वराळे व रावेत येथे करण्यात आली. 

रावेत पोलिसांनी रावेत येथील बीआरटी रूटजवळ तब्बल 4 लाख 43 हजार 600 रुपयांची बिअर विकणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.प्रथम सोमनाथ सोनटक्के (वय 21 रा.रावेत) असे अटक तरुणाचे नाव आहे. प्रथम हा स्विफ्ट डिजायर (एम.एच 14 बी एक्स 4900) या कारमधून बेकायदेशीररित्या दारुची विक्री करीत होता.

इंद्रायणी नदी काठी गावठी दारु तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भिमा लिंबा कंजारभाट (वय36 रा.मोशी) याला अटक केली असून त्रिशुल लिंबा कंजारभाट (रा, मोशी) हा फरार झाला आहे. आरोपी हे मोशीतील सस्ते वस्ती परिसरात इंद्रायणी नदीकाठ परिसरात गावठी दारु तयार करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकत तेथून 76 हजार 100 रुपयांची दारु जप्त केली. (Liquor Seized) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

 

PCMC News : महापालिका रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती द्या; ‘सीएम’ला पाठविले पत्र

तळेगाव एमआयीडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये, वराळे येथे एका पत्राशेडमध्ये 3 हजार  185 रुपयांच्या देशी दारुसह आरोपीला पेलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविंद्र रामप्रकाश ठाकुर (वय.32 रा.वराळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. वरील तीनही कारवाईत पोलिसांनी तीघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला आहे.यावेळी पोलिसांनी तब्बल 5 लाख 22 हजार 885 रुपयांचे मद्य जप्त केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.