Lok Adalat: हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोक अदालतला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ  या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी सेंटर व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या एक दिवसाच्या लोक अदालतला मंगळवारी (दि.4) चांगला प्रतिसाद मिळाला .

ही अदालत कोथरूड येथे सकाळी दहा ते संध्याकाळी चार या वेळेत पार पडला. या सत्रात समुद्र आणि पर्यावरणाचे  अभ्यासक डॉ सुनील मुरलीधर शास्त्री, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते  सारंग यादवडकर,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू  नितीन करमळकर, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे,ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (संपादक,दैनिक सकाळ), शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर , युक्रेन विद्यापीठाच्या प्रा.श्रीमती इरीना हे या लोकअदालत साठी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले की, हवामान बदलाच्या ‘ ग्लोबल ‘ दुष्परिणामांवर ‘ लोकल ‘उपाय आवश्यक आहेत. पूर्वी बिहार,बंगाल,ओरिसा येथेच पूर येत होते. आता 11 राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. सर्व नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहे.अभयारण्ये एका बाजूला आणि खाणी त्यांच्या शेजारी उभ्या राहणे, चिंताजनक आहे.हवामान बदलाच्या दुष्परिणाम जागतिक पातळीवर असले तरी उपाय स्थानिक पातळीवर करता येण्यासारखे आहेत. मात्र, त्याचे धडे कोणत्याही अभ्यासक्रमात नाहीत.

Pune district office : वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडली नाहीत- जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमातून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल लोकांच्या सूचना, उपाय यांचे मूल्यांकन आणि एकत्रीकरण करण्यात आले. आपत्ती कमी करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणे आणि जगभरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. जनता, प्रसारमाध्यमे, पर्यावरण संस्था, सरकार, समुदाय आणि सर्व संबंधित समाजातील घटकांशी  संवाद साधून हे साध्य करायचे आहे. या संकटावर समुदाय आधारित उपाय शोधण्यासाठी जागतिक एकजुटीची नितांत गरज आहे. त्याबद्दल या लोक अदालतीमध्ये चर्चा झाली,असे डॉ विनिता आपटे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांचे निरुपमा कोचलकट्टा,निरंजन खैरे, प्रीती जोशी यांनी स्वागत केले. स्नेहा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.