Monsoon League : ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब आणि गेम स्विंगर्स क्लब या संघांनी विजयाची हॅट्रीक नोंदविली तर, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाने विजयाचा चौकार मारत स्पर्धेत आगेकूच केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुदीप धरणगांवकर याच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघाने एसएसके इलेव्हन संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएसके इलेव्हनला १०३ धावाच जमविता आल्या. हे आव्हान फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने १२.१ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. सुदीप धरणगांवकर याने नाबाद ६६ धावा करून विजयात मोलाचा वाटा उचलला व संघाने सहज विजय मिळवला.

सुरज जी. याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने इलेव्हन स्टॅलियन्स् संघाचा ७१ धावांनी पराभव करून चौथा विजय मिळवला. हर्षद तिडके (५८ धावा) आणि सुरज जी. (५५ धावा) याच्या फलंदाजीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १८५ धावांचे आव्हान उभे केले. याचा पाठलाग करताना इलेव्हन स्टॅलियन्स् संघाचा डाव ११४ धावांवर आटोपला. सुरज जी. याने १५ धावात ४ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली.

अभय चौगुले याच्या ७१ धावांच्या जोरावर गेम स्विंगर्स क्लबने माईटी ईगल्स् इलेव्हन संघाचा ९३ धावांनी पराभव करून तिसर्‍या विजयाची नोंद केली.

Pathsanchalan : रा.स्व.संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात उद्या विजयादशमीनिमित्त 21 ठिकाणी पथसंचलन

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएसके इलेव्हनः १९.२ षटकात १० गडी बाद १०३ धावा (विशाल जाधव १७, महेश शिंदे १५, हृषीकेश आगाशे २-११, अनिल मांडके २-१६, प्रफुल्ल मानकर २-२२) पराभूत वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः १२.१ षटकात ३ गडी बाद १०७ धावा (सुदीप धरणगांवकर नाबाद ६६ (४३, ३ चौकार, ६ षटकार), हृषीकेश आगाशे १६, रणजीत जगताप १-१६); सामनावीरः सुदीप धरणगांवकर;

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १८५ धावा (हर्षद तिडके ५८ (४७, ५ चौकार, १ षटकार), सुरज जी. ५५ (२१, ६ चौकार, ३ षटकार), रोहन काटकर २-२८, हितेश चंदानी २-३८) वि.वि. इलेव्हन स्टॅलियन्स्ः १७.१ षटकात १० गडी बाद ११४ धावा (संकल्प पाटील ३०, श्रेयस राजेंद्र २५, सुरज जी. ४-१५, हर्षद तिकडे २-१३, अजय पाटील २-१६); सामनावीरः सुरज जी.

गेम स्विंगर्स क्लबः २० षटकात ७ गडी बाद १७६ धावा (अभय चौगले ७१ (३९, ८ चौकार, ३ षटकार), क्षितीज तांबे नाबाद ४८, संदीप शिंदे ३-१५) वि.वि. माईटी ईगल्स् इलेव्हनः १४ षटकात ९ गडी बाद ८३ धावा (संदीप शिंदे ३९, ओम साळुंके १९, विकास खाडे २-७, संज्योग राजपुत २-३२); सामनावीरः अभय चौगुले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.