Loksabha Election 2024 : पुणेकरांकडून मतदार आणि लोकशाहीच्या लग्नाचे निमंत्रण; लग्नपत्रिका व्हायरल

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत (Loksabha Election 2024)आहे. त्यामध्ये मतदार आणि लोकशाही यांचे लग्न असून त्या लग्नाचे निमंत्रण या पत्रिकेच्या माध्यमातून मतदारांना देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार (Loksabha Election 2024)आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगासह विविध सामाजिक संघटनांकडून जागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक अनोखी लग्न पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. पुण्यासह मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचेही मतदान 13 मे रोजी होणार आहे. मतदार आणि लोकशाही यांच्या लग्नासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला अनोख्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण देण्यात आले आहे.

Pune: पुण्यात सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, दोन महिलांना स्वारगेट बस स्थानकावरून अटक 

भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव मतदार आहे. त्याचा विवाह भारतीय संविधानाची जेष्ठ सुकन्या लोकशाही हिच्याशी विवाह होणार आहे. वैशाख शु. 12 सोमवार 13 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभ मुहूर्तावर लोकसभा 2024 च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी आपल्या एक एक मतदान रुपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा हेची निमंत्रण अगत्याचे, असे या लग्न पत्रिकेत म्हटले आहे.
आम्ही भारताचे लोक यांच्याकडून हे निमंत्रण देण्यात आले आहे. आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असेही या पत्रिकेत म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.