Lonavala : वलवण येथे बंगल्यात चोरी; 18 हजाराची रोख रोकड चोरली

Burglary at a bungalow at Valvan; 18,000 cash was stolen

एमपीसीन्यूज : वलवण गावातील एका बंगल्यात आज, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकी वाटे प्रवेश करून आतमधील 18 हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली.

याप्रकरणी विजयकुमार चावला यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चावला व घरातील सर्व जण झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास बंगल्याच्या उघड्या खिडकीवाटे चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर बंगल्यातून 18 हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.