Governor Lal ji Tandon Passes Away: मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

Madhya Pradesh Governor Lal ji Tandon passes away पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लालजी टंडन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

एमपीसी न्यूज- मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. तत्पूर्वी सोमवारी लालजी टंडन यांची प्रकृती गंभीर होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच्यावर लखनौ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांना भाऊ मानले होते. त्या त्यांना राखीही बांधत असत.


लालजी टंडन यांची प्रकृती बिघडल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लखनौमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालजी टंडन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. श्रद्धेय श्री लालजी टंडन यांना विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. टंडनजींनी समाजाच्या सेवेसाठी अमूल्य योगदान दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. एक कुशल प्रशासक आणि सामान्य लोकांच्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर राहत.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही लालजी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.