Maharashtra Corona Update : राज्यात आज एकही नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) कोरोनाच्या 39,207 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 38,824 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.32 टक्के एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद नाही.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 लाख 82 हजार 128 एवढी झाली आहे. त्यापैकी 68 लाख 68 हजार 816 जण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 2 लाख 67 हजार 659 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 41 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 23 लाख 20 हजार 366 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 23 लाख 44 हजार 919 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2,960 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज एकही नवीन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद नाही

राज्यात आज एकही नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. राज्यात आजवर 1 हजार 860 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालीय. त्यापैकी 1001 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.