Maharashtra Corona Update : राज्यात 19.55 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.67 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात आज 1 हजार 622 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 लाख 55 हजार 548 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.67 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 2 हजार 673 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 44 हजार 071 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 35 हजार 948 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 30 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 310 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.51 टक्के एवढा आहे. आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 77 हजार 683 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 20 लाख 44 हजार 071 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 72 हजार 311 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 979 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.