Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्ण संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) 28,286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 21,941 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 लाख 35 हजार 511 एवढी झाली आहे. त्यापैकी 70 लाख 89 हजार 936 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.08 टक्के एवढा आहे.

 

सध्याच्या घडीला राज्यात 2 लाख 99 हजार 604 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 42 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.