Maharashtra Corona Update : राज्यात आज 55,411 ; मुंबईत 9,327 तर पुण्यात 4,953 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णवाढ कायम असून, आज दिवसभरात राज्यात तब्बल 55 हजार 411 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9 हजार 327 मुंबईत तर, 4 हजार 953 रुग्णांची पुण्यात वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 27 लाख 48 हजार 153 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 53 हजार 005 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.28 टक्के एवढं झाले आहे.

 

_MPC_DIR_MPU_II

राज्यात सध्या 5 लाख 36 हजार 682 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 57 हजार 638 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.72 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 30 लाख 41 हजार 080 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 297 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 18 लाख 51 हजार 235 नमूने तपासण्यात आले आहेत.

रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनीधींची बैठक घेतली होती.

त्यावेळी जिल्हास्तरावर रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश टोपे यांनी आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.