Maharashtra Corona Update : राज्यात आज 5,787 नवे रुग्ण; 5,352 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 5 हजार 787 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 352 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या 62 हजार 452 ॲक्टिव्ह कोरोना आहेत.

 

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 96 हजार 805 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 95 हजार 744 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 139 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.86 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 11 लाख 11 हजार 895 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 53 हजार 129 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 530 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.