Maharashtra Corona Update: दिलासादायक! आज दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) दिवसभरात दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 1,966 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 11,408 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर खाली आली आहे.

://www.youtube.com/watch?v=C1cT7Wcd7Gc

सध्याच्या घडीला राज्यात 36 हजार 447 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 44 हजार 915 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 61 हजार 077 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.66 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 416 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.
आजवर 7 कोटी 65 लाख 27 हजार 895 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 815 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 3,48,408 जण होम क्वारंटाईन आहेत.

ओमायक्रॉन अपडेट

महाराष्ट्रात आज दिवसभरात 8 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. आठही रुग्ण मुंबई मधील आहेत. आजवर राज्यात 3,994 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी 3,334 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.