Pune News: शहरात दिवसभरात केवळ 228 नवे रुग्ण

 एमपीसी न्यूज:  पुण्यात कोरोना बाबत दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज ३ जानेवारी नंतर प्रथमच 500 च्या आत रुग्ण संख्या आली असून आज पुण्यातील एकही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही.शहरात दिवसभरात केवळ 228नवे रुग्ण आढळून आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=C1cT7Wcd7Gc

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील विविध तपासणी केंद्रांवर 3 हजार 994 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़ यापैकी 228 जण बाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी 5.82 टक्के इतकी आहे. आज दिवसभरात 920 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्याबाहेरील तीन जण उपचारादरम्यान दगावले आहे. सध्या विविध रूग्णालयात 29 जण व्हेंटिलेटरवर, १९ जण आयसीयूमध्ये तर २०२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.