Maharashtra Corona Update : सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

आज, सोमवारी दिवसभरात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ; For the third day in a row, more corona-free patients than new patients

एमपीसी न्यूज – राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज, सोमवारी दिवसभरात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर 8,968 नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 50 हजार 196 वर जाऊन पोहचली आहे.

त्यापैकी आतापर्यंत राज्यभरात 2 लाख 87 हजार 030 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 63.73 टक्के आहे. तर सध्या 1 लाख 47 हजार 17 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 266 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण मृतांची संख्या 15,842 वर जाऊन पोहोचली आहे.

राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण पुणे येथे 41 हजार 664 असून त्यानंतर बत्तीस हजार 191 ॲक्टिव रूग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत मुंबईत 20 हजार 528 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 22 लाख 98 हजार 723 नमुन्यांपैकी 4 लाख 50 हजार 196 नमुने पॉझिटिव्ह (19.58 टक्के) आले आहेत. राज्यात 9 लाख 40 हजार 486 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 37 हजार 009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 266 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.