Maharashtra Corona Update: 69 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त तर सुमारे 63 हजार रुग्णांवर उपचार सुरू

Maharashtra Corona Update: More than 69 thousand patients are corona free but still 62 thousand 833 patients under treatment राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा साडेसहा हजारांच्या पुढे, सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के एवढा आहे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या 3 हजार 214 नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  62 हजार 833 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1 हजार 925 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 69 हजार 631 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 50.09 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 2 हजार 775 नमुन्यांपैकी 1 लाख 39 हजार 10 नमुने पॉझिटिव्ह (17.31 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 5 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 572 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 248 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी 75 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 173 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा 6 हजार 531 वर पोहचला आहे.

गेल्या 48 तासात नोंद झालेल्या 75 मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-42, भिवंडी-निजामपूर मनपा-1, धुळे मनपा-1, पुणे-1, पुणे मनपा-8, पिंपरी-चिंचवड मनपा-2 सोलापूर मनपा-1, सातारा-1, सांगली-1, रत्नागिरी-4, औरंगाबाद-1, औरंगाबाद-8, अकोला -1, अमरावती मनपा-1,  यवतमाळ-1, बुलढाणा-1 अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (68,410), बरे झालेले रुग्ण- (34,576), मृत्यू- (3,844), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(8), ॲक्टिव्ह रुग्ण- (29,982)

ठाणे: बाधित रुग्ण- (26,506), बरे झालेले रुग्ण- (10,766), मृत्यू- (751), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (14,988)

पालघर: बाधित रुग्ण- (3,866), बरे झालेले रुग्ण- (1,154), मृत्यू- (93), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2619)

रायगड: बाधित रुग्ण- (2,714), बरे झालेले रुग्ण- (1,711), मृत्यू- (93), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (908)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (504), बरे झालेले रुग्ण- (352), मृत्यू- (23), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (129)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (164), बरे झालेले रुग्ण- (144), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (16)

पुणे: बाधित रुग्ण- (16,907), बरे झालेले रुग्ण- (9,142), मृत्यू- (624), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7,141)

सातारा:  बाधित रुग्ण- (868), बरे झालेले रुग्ण- (632), मृत्यू- (40), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (195)

सांगली: बाधित रुग्ण- (302), बरे झालेले रुग्ण- (172), मृत्यू- (9), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (121)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (750), बरे झालेले रुग्ण- (691), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (51)

सोलापूर: बाधित रुग्ण- (2345), बरे झालेले रुग्ण- (1170), मृत्यू- (215), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (960)

नाशिक: बाधित रुग्ण- (2965), बरे झालेले रुग्ण- (1620), मृत्यू- (179), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1166)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (300), बरे झालेले रुग्ण- (224), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (64)

जळगाव: बाधित रुग्ण- (2476), बरे झालेले रुग्ण- (1267), मृत्यू- (189), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1020)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (89), बरे झालेले रुग्ण- (52), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

धुळे: बाधित रुग्ण- (587), बरे झालेले रुग्ण- (350), मृत्यू- (47), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (188)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (3686), बरे झालेले रुग्ण- (1982), मृत्यू- (201), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1503)

जालना: बाधित रुग्ण- (395), बरे झालेले रुग्ण- (259), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (125)

बीड: बाधित रुग्ण- (102), बरे झालेले रुग्ण- (68), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (31)

लातूर: बाधित रुग्ण- (227), बरे झालेले रुग्ण- (149), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (65)

परभणी: बाधित रुग्ण- (85), बरे झालेले रुग्ण- (74), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7)

हिंगोली: बाधित रुग्ण- (262), बरे झालेले रुग्ण- (226), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (35)

नांदेड: बाधित रुग्ण- (295), बरे झालेले रुग्ण (178), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (106)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (183), बरे झालेले रुग्ण- (130), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (47)

अमरावती: बाधित रुग्ण- (463), बरे झालेले रुग्ण- (312), मृत्यू- (24), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (127)

अकोला: बाधित रुग्ण- (1272), बरे झालेले रुग्ण- (788), मृत्यू- (66), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (417)

वाशिम: बाधित रुग्ण- (79), बरे झालेले रुग्ण- (44), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (176), बरे झालेले रुग्ण- (117), मृत्यू- (9), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (50)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (251), बरे झालेले रुग्ण- (161), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (82)

नागपूर: बाधित रुग्ण- (1352), बरे झालेले रुग्ण- (897), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (442)

वर्धा: बाधित रुग्ण- (14), बरे झालेले रुग्ण- (11), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2)

भंडारा: बाधित रुग्ण- (77), बरे झालेले रुग्ण- (49), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (28)

गोंदिया: बाधित रुग्ण- (101), बरे झालेले रुग्ण- (72), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (29)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (60), बरे झालेले रुग्ण- (44), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (16)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (60), बरे झालेले रुग्ण- (47), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (12)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (117), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (20), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (97)

एकूण: बाधित रुग्ण-(1,39,010), बरे झालेले रुग्ण- (69631), मृत्यू- (6531), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(15),ॲक्टिव्ह रुग्ण-(62833)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.