Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट 97.85 टक्के, मृत्यूदर 1.82 टक्के 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी)  दिवसभरात 2,068 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 4,709 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर 76 लाख 86 हजार 670 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.85 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 55 हजार 359 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 21,159 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 547 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

आजवर 7 कोटी 70 लाख 01 हजार 972 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 1,139 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2,37,252 जण होम क्वारंटाईन आहेत.

ओमायक्रॉन अपडेट 

महाराष्ट्रात आज एकही नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आजवर राज्यात 4,456 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 3,531 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.