Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष – गिरीश बापट

एमपीसी न्यूज: पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीत दोन-चार लोकच निर्णय घेतात. तो पक्ष परिवार वादी आहे असे म्हणत गिरीश बापट यांनी सडकून टीका केली. 
पुण्यात आज खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर गिरीश बापट यांनी ही पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गिरीश बापट म्हणाले आंदोलन करणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचे नव्हे तर माझेच कार्यकर्ते होते. ते मला नेहमी मदत करतात. आंदोलन होणार असल्याचे समजल्यानंतर त्या ठिकाणी माझे दोनशे ते तीनशे कार्यकर्ते जमा झाले होते. परंतु मीच त्यांना शांत राहण्यास सांगितलं होतं.
गिरीश बापट यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना ही आव्हान दिले आहे. 15 मार्चला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा जगताप यांनी केला होता. मात्र त्यावर बोलताना पापड यांनी 16 मार्चला भेटू असं आव्हान जगताप यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.