Maharashtra Corona Update : आज  11,394 नवे कोरोना रुग्ण, 21,677 डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) दिवसभरात 11,394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 21,677 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 77 लाख 94 हजार 034 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 13 हजार 436 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.40 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 68 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 008 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 33 हजार 655 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजवर 7 कोटी 54 लाख 10 हजार 043 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,447 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 7,95,422 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.