U-19 World Cup; युवा वर्ल्डकप पाचव्यांदा जिंकण्यासाठी भारतीय संघापुढे 190 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी): वेस्ट इंडिज मध्ये होत असलेल्या 19 वर्षाखालील युवा संघाच्या विश्व करंडक स्पर्धेच्या अंतीम सामन्यात भारतीय युवा गोलंदाजानी प्रभावी कामगिरी करत इंग्लड संघाला 189 धावांत गुंडाळून आपली कामगीरी फत्ते पाडत विजयाचा पाया रचला  आहे,आता  फलंदाजांना यावर कळस चढवणारी कामगिरी करावी लागणार आहे 19 वर्षाखालील युवकांच्या विश्वकप स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड युवा संघाबरोबर लढला.

 

आजच्या अंतीम सामन्याला अँटीगा वेस्ट इंडीजमध्ये खेळवला गेला,ज्यात नानेफेकीचा कौल इंग्लंड संघाच्या बाजूने लागला.इंग्लिश संघाचा कर्णधार टॉम प्रेस्टने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा,पण या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करणाऱ्या रवी कुमारने साहेबांना अगदी सुरुवातीलाच  दोन मोठे धक्के देत हा निर्णय चुकलाय असे दाखवून दिले.त्याने आपल्या पहिल्या तीन षटकात केवळ 11 धावा देत सलामीची जोडी फोडली.जेकबला दोनआणि कर्णधार प्रेस्टला तर त्याने भोपळाही फोडू न देता बाद करून इंग्लिश गोटात एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर रवी बावाने दुसरा सलामीवीर थॉमसला वैयक्तिक 27 धावावर असताना कर्णधार यश धुलच्या हातून झेलबाद करून इंग्लंड संघाची अवस्था तीन बाद 37 अशी केली.

यानंतर राज बावा या युवा मध्यमगती गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना इंग्लिश संघाला एकापाठोपाठ एक हादरे द्यायला सुरुवात केली, ज्यात इंग्लंड संघाची पुरती वाताहत उडाली. बघताबघता त्यांच्या सहा विकेट्स केवळ 61 धावांवर पडल्या,बावाने  सुंदर गोलंदाजी करताना यातल्या चार विकेट्स आपल्या नावावर करताना केवळ सात षटकात 19 धावा देत आपल्या नावावर केल्या.एका बाजूने लागोपाठ विकेट्स पडत असताना जेम्स रे या डावखुऱ्या फलंदाजांने मात्र आपल्या बाजूने झुंज चालूच ठेवली.त्याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेवून जबरदस्त प्रतिकार केला.अलेक्स होर्टन सोबतची 30 धावांची छोटी भागीदारी संपल्यानंतर त्याने जेम्स सेल्स सोबत आणखी एक मोठी आणि महत्वपूर्ण भागीदारी करत डाव चांगलाच सावरला.यांनी चांगली भागीदारी केल्याने इंग्लड संघाला सामन्यात वापस आणले.तो खूप सुंदर खेळत होता ,आपल्या शतकाला तो नक्कीच गाठून पूर्ण करणार आणि आपले नाव क्रिकेट इतिहासात अजरामर करेल असे वाटत असतानाच रवी कुमारने त्याला 95 धावांवर बाद करून त्याची अप्रतिम खेळी संपवली. आणि आठव्या गड्यासाठीं भारताला त्रासदायक ठरणारी 93 धावांची भागीदारीही तोडली.त्याच षटकात त्याने आणखी एक बळी घेत इंग्लंड युवा संघाचा नववा आणि आपला चौथा बळी मिळवला आणि त्यानंतर थोड्याच वेळात रवी बावाने बॉयडेंनला बाद करत आपला पाचवा बळी मिळवून विक्रमी कामगिरी केली आणि इंग्लिश संघाचा डाव 45 षटकातच  189 धावांवर संपला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.