Maharashtra Corona Update : काळजी घ्या! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात मोठी रुग्णवाढ

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरायला लागला आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवारी) राज्यात 8 हजार 067 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, त्यापैकी 4 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 78 हजार 821 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 09 हजार 096 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 1,766 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 97.46 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 24 हजार 509 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 592 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,079 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.