Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची विश्रांती

एमपीसी न्यूज – जुलै महिन्यातील दमदार हजेरीनंतर (Maharashtra Rain) ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या मान्सूनवर आता अल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता असून, 4 ते 10 ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

या संदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनची वाटचाल आणि भविष्यातील नैसर्गिक धोक्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशातील मान्सूनवर अल निनो बरोबरच इतरही गोष्टींचा परिणाम होतो.

सध्या राज्यासह देशभरात जरी समाधानकारक पाऊस दिसत असला, तरी त्याचे वितरण असमान आहे. तसेच कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनाही आता वाढल्या आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

केवळ भारतीय हवामानशास्त्र विभागच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय हवामान संस्थाही असा अंदाज व्यक्त करत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे (Maharashtra Rain) अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालजवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ते 9 ऑगस्ट या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.

Maharashtra : धक्कादायक! जयपूर एक्सप्रेसमध्ये पोलिसाकडूनच गोळीबार, चार प्रवाशांचा मृत्यू

हवामान विभागाने मागील 50 ते 60 वर्षांतील मान्सूनचे वर्तन अभ्यासले असून, त्याचा भारतातील मुक्काम वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. असे डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. पावसाच्या आगमनास फारसा फरक नाही मात्र, परतण्याचा कालावधी वाढला आहे.

त्यामुळे खरिपाच्या पिकांचेही नुकसान होत असून येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असेल. राज्यातील पावसात नेहमीच अनिश्चितता पाहायला मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.