Pune : पुण्यात लागले ‘Go back mr.crime minister’चे फ्लेक्स; युवक कॉँग्रेसचा विरोध सुरूच!

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 1 ऑगस्ट रोजी (Pune) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍याला पुणे शहर युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात येत असून ‘Go back mr.crime minister’ अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागात लागले आहेत.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 10 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराच्या कमिटीमध्ये रोहित टिळक होते आणि ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत.

Pavana Dam : पावसाची विश्रांती; पवना धरण 86 टक्क्यांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जाऊ नये अशी मागणी शहरातील काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रोहित टिळक यांच्याकडे केली होती. तर, या पुरस्काराबाबत हायकमांडकडे तक्रार करीत नाराजी देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडीनंतर (Pune) उद्या 1 ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार सोहोळ्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक संघटना एकत्रित आल्या आहेत. उद्या 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाण्याच्या मार्गावर मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन जाणार आहे.

पण, त्यापूर्वीच शहर काँग्रेसकडून Go back mr.crime minister अशा आशयाचे फ्लेक्स शहरातील अनेक भागात लागले आहे. तर या फ्लेक्सची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.