Pimpri News : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाच्या आयोजनाबाबत पालिकेत होणार बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाच्या आयोजनासंदर्भात पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात होणार आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीसाठी शहरातील विविध संस्था, पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, जयंती उत्सव समितींचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विचार प्रबोधनपर्वाच्या माध्यमातून थोर महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 14 एप्रिल या कालावधीत अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी देखील अशा प्रकारच्या प्रबोधनपर्वाचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पूर्वनियोजन बैठक पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत होणार आहे. या बैठकीत प्रबोधन पर्वाच्या रूपरेषेबद्दल विचारविनिमय केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.