Alandi News : अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाकडून लैंगिक आत्याचार

एमपीसी न्यूज – वीस वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी तीन वाजता आळंदी येथे ही घटना घडली. 

अल्पवयीन मुलीच्या आईने रविवारी (दि.20) आळंदी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून कृष्णा तुकाराम सातपुते (वय 20, रा. वडगाव रोड, खेड) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (1), 354, बाल लैंगिक आत्याचार 2012 चे कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, आरोपी कृष्णा याने अल्पवयीन फिर्यादी यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक आत्याचार केला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.