Pimpri : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे महारक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील हुतात्मा कोठारी बंधू व कारसेवेत बलिदान दिलेल्या असंख्य श्रीरामभक्तांच्या बलिदान समरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याहीवर्षी उद्या (रविवारी)  शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, राहटणी, संत तुकाराम नगर, दापोडी, दिघी, बोपखेल, भोसरी, गणेशनगर थेरगांव, भोरडेनगर थेरगाव, वाकड, मोशी, घरकुल चिखली, कासारवाडी अशा तब्बल 17  ठिकाणी शिबिर होणार आहे.

जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.