Hinjawadi : हातचलाखीने किराणा दुकानातील कॅश लुटणाऱ्या दोघांना अटक

हिंजवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – हातचलाखीने किराणा मालाच्या दुकानातील रोकड लांबवणाऱ्या दोन इराणी गुन्हेगारांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (दि. 26) ही कामगिरी केली.

शौकत खानजमान इराणी (वय 50), बाबा तारिल्ला इराणी (वय 40, दोघे रा. शिवाजीनगर, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी आरोपींनी बावधन येथील एका किराणा मालाच्या दुकानातून सुटे पैसे घेण्याच्या बहाण्याने हातचलाखीने गल्ल्यातील 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक अतिक शेख यांना माहिती मिळाली की, किराणा मालाच्या दुकानातून पैसे चोरणारे इराणी गुन्हेगार बावधन येथील एसबीआय बँकेसमोर सावज शोधत फिरत आहेत. त्यानुसार परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली. त्यानंतर कसून तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.