Pimpri : एकसष्ठीनिमित्त मानव कांबळे यांचा 12 मार्चला भव्य नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते 12 मार्चला करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरीतील, आचार्य अत्रे रंगमंदिरात गुरुवारी (दि.12)  सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू , स्वराज अभियान महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव साने, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन, एस एम जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष वारे, कामगार नेते डॉ.अजित अभ्यंकर ,जन आंदोलनाच्या नेत्या अॅड. सुरेखा दळवी कामगार नेते दिलीप पवार, किशोर ढोकले , डॉ. कैलास कदम, यशवंत भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खा. अमर साबळे ,आमदार लक्ष्मण जगताप, आ.महेश लांडगे, आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मानव कांबळे यांच्या संघर्षशील जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व कामगार ,कष्टकरी, नागरिक ,सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने त्यांच्या सामाजिक कार्याचा बहुमान म्हणून त्यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मानव कांबळे नागरी सत्कार समिती पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.