Manoj Jarange Patil : ‘एक मराठा लाख मराठा’च्या गर्जनेत जरांगे पाटील यांची पदयात्रा पुणे जिल्ह्यात दाखल

एमपीसी न्यूज – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा (Manoj Jarange Patil)शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे. मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघाले आहेत.

ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी मराठा बांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या गर्जनेत मनोज जरांगे यांचे पुणे जिल्ह्यात स्वागत केले.

अहमदनगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात(Manoj Jarange Patil) ही पदयात्रा मुक्कामी असणार आहे. पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस, तसेच पुणे जिल्हा पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पदयात्रेदरम्यान ठीक ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत.

 

Moshi : माझ्या घरच्यांचे फोन का उचलते म्हणून पत्नीला मारहाण, पती विरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवारी वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत पदयात्रेचा मुक्काम आहे. यासाठी स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बुधवारी (दि. 24) ही पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे, बुधवारी पदयात्रा सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिल मार्गे चापेकर चौक चिंचवडगाव मार्गे चिंचवड स्टेशन, खंडोबा मंदिर, आकुर्डी, निगडी, भक्ती शक्ती समूह शिल्प, तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.