Pune News : पुण्यात फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज : पुण्याच्या पिसोळी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 2400 स्क्वेअर फुटाचे फर्निचरचे गोदाम भस्मसात झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिसोळीच्या दगडे वस्ती येथे फर्निचरच्या गोडाऊनला आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर पुणे आणि पीएमआरडीएच्या 14 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर असल्यामुळे आगीने पाहता पाहता रुद्र रूप धारण केले. या आगीत अंदाजे 24 हजार स्क्वेअर फुटाचे संपूर्ण गोडाऊन भस्मसात झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी अजूनही आग पूर्णपणे वीजवण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.